Ad will apear here
Next
‘मोबाइलच्या अतिवापराने विविध आजारांना निमंत्रण’
मिलींद बेंबळकर यांचे मत

पुणे : ‘मोबाइलच्या अतिवापरामुळे, तसेच परिसरातील मोबाइल टॉवरमुळे विविध आजारांचे प्रमाण मोठया प्रमाणावर असल्याचे उघड झाले आहे. अनेक संस्था व डॉक्टरांच्या संशोधनानुसार मोबाइल टॉवरच्या रेडिएशनमुळे कर्करोग, स्तनाचा कर्करोग, हृदयविकार आदी आजार उद्भवतात. मोबाइलच्या अतिवापरामुळे डीएनए तुटून फ्री रॅडिकल तयार होतात. इतर देशाच्या तुलनेत आपल्या देशातील मोबाइल वापराचे प्रमाण जास्त आहे आणि आजकालच्या टेलिकॉम कंपन्यांच्या विविध डेटा ऑफर्स आणि फ्री कॉलिंगमुळे अलीकडे हे प्रमाण अधिकच वाढले आहे. त्याचा परिणाम सर्व वयोगटातील व्यक्तींवर झाल्याचे स्पष्ट झाले आहे,’ असे मत रेडिएशन तज्ञ मिलिंद बेंबळकर यांनी व्यक्त केले.

मिलींद बेंबळकर यांचा सत्कार करताना विनय र. र.

मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने शिवाजीनगर येथील दि इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्सच्या फिरोदिया सभागृहात आयोजित ‘मोबाइल वापराचे परिणाम’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी मायक्रोवेव्ह रेडिएशनचे अभ्यासक सुरेश कर्वे, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र., राजेंद्र सराफ, संजय मालती कमलाकर आदी उपस्थित होते. 

‘कर्करोग, नपुंसकता, डोकेदुखी, थकवा, बधिरपण येणे इत्यादी आजारांमुळे २० टक्के तरुण पिढी ग्रासली आहे. उंदरांवर केलेल्या प्रयोगातून रेडिएशनचे दुष्परिणाम सिद्ध झाले आहेत. मोबाइलचा मानवाच्या आरोग्यावर परिणाम होतो, हे सिद्ध झाले नसल्याचे टेलिकॉम कंपन्या सांगतात. त्यामुळे मोबाईलचा वापर तारतम्यतेने करावा,’ असेही बेंबळकर यांनी सांगितले. 

सुरेश कर्वे म्हणाले, ‘मानवीवस्तीत असलेल्या टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे आणि मोबाईलच्या अतिवापराने येत्या दहा वर्षात कर्करोगाची त्सुनामी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोबाइलचा वापर बेताने करणे गरजेचे आहे. मोबाइल तसेच इतर उपकरणे ‘शॉर्ट टर्म युज’साठी आहेत. सहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाइल वापरल्याने उष्णता वाढते. त्यामुळे त्याचा जास्त वापर टाळावा. मोबाईलवर बोलताना तो कानापासून दहा मिलीमीटर अंतरावर राहील याची काळजी घ्यावी. कानात घातले जाणारे हेडफोन्स, ब्लू टूथ उपकरण म्हणजे कानात बसविलेला छोटा टॉवर, त्यामुळे आपण स्वःत आजरांना निमंत्रण देत आहोत. पालकांनी लहान मुलांना मोबाइल देणे सहसा टाळावे किंवा मोबाइल एरोप्लेन मोडवर ठेवून द्व्यावा. त्यामुळे रेडिएशनचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो. लहान मुलांबरोबरच गरोदर महिलांनीदेखील मोबाइल वापर टाळावा.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZPKCA
Similar Posts
‘मेंदू आणि व्यक्ती विकास’ विषयावर डॉ. श्रुती पानसे यांचे व्याख्यान पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेंदू आणि व्यक्ती विकास’ या विषयावर डॉ. श्रुती पानसे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. मयूर कॉलनीतील इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या सभागृहात गुरुवारी, २८ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता हे
२५० महिलांनी घेतला कर्करोग तपासणी शिबिराचा लाभ कोपरगाव : स्तनाचा कर्करोग जागरूकता महिन्यानिमित्त रुबी हॉल क्लिनिकच्या वतीने नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कर्करोग तपासणी आणि जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे २५० महिला, मुलींनी या शिबिराचा लाभ घेतला.
‘समाजाची वाटचाल शब्दहीन संवादाकडे’ पुणे : ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात माणसांमधील संवाद कमी झाला आहे. माणसे एकमेकांशी बोलण्यापेक्षा मोबाइल आणि त्यासारख्या इतर तंत्रज्ञानावर अधिक वेळ घालवत आहेत. संवाद साधण्यासाठी शब्दांपेक्षा आज चित्र आणि दृश्यांचा अधिक वापर होत असून, समाजाची वाटचाल शब्दहीन संवादाकडे होत आहे,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक, भाषातज्ज्ञ डॉ
तिच्या जिद्दीपुढे मृत्यूही हरला पुणे : सध्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे लढा देत असलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या सकारात्मक वृत्तीचे कौतुक केले जात आहे. तशीच जिद्द दाखवून सोलापूरच्या पन्नास वर्षीय महिलेने ‘ग्लिओब्लास्टोमा’ या दुर्मीळ प्रकारच्या कर्करोगाला हरवले आहे. रुबी हॉल क्लिनिकमध्ये पाच वर्षे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता त्या पूर्ण बऱ्या झाल्या आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language